आमदार महेश लांडगे, भाजप नेते गणेश बिडकर यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या आणि मनसेचे वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या. तरुणीने प्रेमास नकार दिल्याने तिला गुन्ह्यात अडकवण्याच्या हेतूने त्याने हे कृत्य केल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे.  यापूर्वीही तो याच स्वरूपाच्या गुन्ह्यात अटकेत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> धक्कादायक: पिंपरीत बलात्कार करून काढले विवाहित महिलेचे न्यूड फोटो, फरार आरोपीच्या शोधात चिंचवडचे पोलीस

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक दीपक उर्फ बाबा मिसाळ यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून खंडणी मागणाऱ्या सराइतास बिबवेवाडी पोलिसांनी तेलंगणातून अटक केली. इम्रान समीर शेख,( रा. ७९, विकासनगर, घोरपडी गाव, पुणे) हे संशयित आरोपीचे  नाव आहे. बाबा मिसाळ (रा. लष्कर) यांच्याकडे खंडणी मागितल्याच्या गुन्ह्याची गेल्या वर्षी नोंद करण्यात आली होती. त्या गुन्ह्यात पोलिसांनी इम्रानला तेलंगणामधून अटक केली होती. त्या गुन्ह्यात त्याची नुकतीच जामिनावर मुक्तता झाली. त्यानंतर, त्याने पुन्हा लोकप्रतिनिधींना फोन करून खंडणीसत्र आरंभले.

हेही वाचा >>> पुणे: डोक्यात कुकर घालून पत्नीचा खून

इम्रान विवाह नोंदणी केंद्र चालवतो. त्याच्याकडे एका मुलीचे विवाह नोंदणीसाठी प्रोफाईल आले होते. ती मुलगी त्याला आवडल्याने  त्याने स्वतःच या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यास मुलीने नकार दिला. त्यामुळे चिडून रागाने या व्यक्तीने त्या मुलीच्या नावाने राजकीय नेत्यांना धमक्या देण्यास मागील काही दिवसांपासून सुरुवात केली, अशी माहिती तपासात पुढे आली. पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून राजकीय व्यक्ती उद्योजक यांना लाखो रुपयांच्या खंडणी मागितल्या जात असल्याचे प्रकार वाढले होते. त्यामध्ये  भाजपचे आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे आणि मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या मुलाला दूरध्वनी करून खंडणी मागण्यात आल्याने खळबळ उडाली होती. इम्रान यानेच या सर्वाना दूरध्वनी केले आहेत. तो खराडीमध्ये रक्कम घेऊन येण्यासाठी धमकावत असे. तसेच, या मुलीच्या मोटारीचा नंबर हेतुतः देत असे. खंडणीविरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषण करून त्याच्या मुसक्या आवळल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested for demanding ransom from public representatives pune print news vvk 10 zws
Show comments