पुणे: समाज माध्यमातील स्टेटसवरुन वाद झाल्याने तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना हडपसर भागातील सय्यदनगर परिसरात घडली. टोळक्याने काेयते उगारून दहशत माजविली. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी दोघांना अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याप्रकरणी आरीफ उर्फ तालीम आसमहंमद (वय २३), साहिल खान (वय २०), टप्पू खान वय (१९), आयान आरीफ शेख (वय १९), गुलाम गौसखान (वय २२, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समीर इक्बाल शेख (वय १९, रा. सय्यदनगर, हडपसर) याने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

हेही वाचा >>>Chandrakant Patil : पुण्याचं पालकमंत्रिपद कोणाला मिळणार? चंद्रकांत पाटलांचं मोठं भाष्य; म्हणाले, “माझे वरिष्ठ…”

समीर शेख, त्याचे मित्र इरफान शेख, अस्लम, फरदीन हे ४ डिसेंबर रोजी रात्री सय्यदनगर भागातील गल्ली क्रमांक २८ येथे थांबले होते. त्यावेली आरोपी आरीफ आणि साथीदार तेथे आले. तू समाज माध्यमात तू कुत्ता है, असे छायाचित्र का लावले ? अशी विचारणा करुन आरोपींनी समीर कोयत्याने वार केले. त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर टोळक्याने काेयते उगारून परिसरात दहशत माजविली. या घटनेनंतर परिसरा घबराट उडाली.

पसार झालेले आरोपी गुलाम गौस खान आणि आयान अरीफ शेख यांना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत.