पुणे : मेहुणीच्या घरात चोरी करणाऱ्या एकास कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

कदीरपाशा पीरमहंमद सौदागर (वय ३२, रा. येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत २६ वर्षीय मेहुणीने फिर्याद दिली होती. २१ मार्च रोजी कोंढव्यातील भाग्योदयनगर भागात ही घटना घडली होती. २१ मार्च रोजी सायंकाळी मेहुणी मुलीला घेऊन कामानिमित्त बाहेर गेली हाेती. त्या वेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून सौदागर मेहुणीच्या घरात शिरला आणि त्याने कपाटातून आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबविले.

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Bangladesh citizens Ratnagiri, Anti-Terrorism Squad,
रत्नागिरीत तेरा बांगलादेशी घुसखोरांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
Police raid unauthorized bar in Ghatkopar and rescue eight bar girls Mumbai news
घाटकोपरमध्ये अनधिकृत बारवर पोलिसांचा छापा; आठ बारबालांची सुटका

हेही वाचा – पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सौदागर याने मेहुणीच्या घरात चाेरी केल्याची माहिती तपासात मिळाली. सापळा लावून सौदागरला पकडण्यात आले. त्याच्याकडून आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय मोगले, उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, सतीश चव्हाण, नीलेश देसाई, जोतिबा पवार, गोरखनाथ चिनके आदींनी ही कारवाई केली.