लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली.

ओंकार झुंगजी खेगाळे (२३, रा. वडगाव मावळ, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खेगाळे मावळ तालुक्यातील असून तो मित्राला भेटण्यासाठी पुण्यात आला होता. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील दरी पूल परिसरात एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी राहुल तांबे आणि धनाजी धोत्रे यांना मिळाली. यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा लावन खेगाळे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा एक पिस्तूल आणि तीन काडतूसे आढळून आली. खेगाळे सराइत गुन्हेगार नाही. त्याने पिस्तूल कशासाठी बाळगले होते, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

आणखी वाचा- VIDEO : पिंपरीत भरधाव कारची डॉक्टरला भीषण धडक; घटना सीसीटीव्हीत कैद

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, राहुल तांबे, धनाजी धोत्रे, सचिन सरपाले, शैलेश साठे आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader