पुणे : प्रेम प्रकरणातून तरुणाने देशी बनावटीच्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना हडपसर भागात घडली. विवेक वसंत कोकाटे (वय २१, रा. ओैंदुंबर पार्क, गोपाळपट्टी, हडपसर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोकाटे याने प्रेमप्रकरणातून डोक्यात देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे, अशी माहिती हडपसर पोलिसांनी दिली. विवेकने महिनाभरापूर्वी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला हाेता. त्याने शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास घरात कोणी नसताना पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man attempt suicide by shooting himself due to a love affair pune print news rbk 25 zws