लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : कर्ज काढण्यासाठी आधार कार्ड देत नाही, या कारणावरून चिडलेल्या पतीने पत्नीच्या पोटात चाकू खुपसून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (५ फेब्रुवारी) दुपारी बाराच्या सुमारास निगडीतील ओटास्कीम येथे घडली.
याप्रकरणी मायकल ऑगस्टीन जॉन (वय २५) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऑगस्टीन अँथोनी जॉन (वय ४५, दोघे रा. सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, ओटास्किम, निगडी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन यांचे आरोपी वडील व जखमी सावत्र आई घरामध्ये असताना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास ऑगस्टीन याने कर्ज काढण्यासाठी आधार कार्ड का देत नाही, या कारणावरून जॉनची सावत्र आई सिमा जॉन हिस हाताने मारहाण करीत शिवीगाळ केली. त्यानंतर किचनमधील चाकू आणून ‘तु मला आधार कार्ड का देत नाही. तुला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणत त्याच्या हातातील चाकूने जॉन यांच्या आईचा जिव घेण्याचे उद्देशाने तिच्या पोटात मारुन तिला गंभीर जखमी केले. फौजदार सातपुते तपास करीत आहेत.