विवाह न करता एकत्र राहणाऱ्या तरुणीला जाळ्यात ओढून एकत्र आत्महत्या करु, असा तगादा लावणाऱ्या तरुणाने तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कोंढवा भागात घडली. तरुणीने नकार दिल्यानंतर तरुणाने स्वत:वर चाकून वार केले, तसेच इमारतीच्या छतावरुन उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली.

हेही वाचा >>> पुणे: स्वारगेट परिसरात तंबाखू व्यापाऱ्यावर गोळीबार करणारा गजाआड

Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
MLA Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? पोलिसांवर दबाव आहे का? संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले

याप्रकरणी योगेश प्रकाश थोरात (वय २८, रा. साकुर्डी, सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. याबाबत एका १९ वर्षाच्या तरुणीने कोढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश थोरात हा तरुणीच्या घरा शेजारी राहत होता. त्याने तरुणी अल्पवयीन असताना तिला विवाहाचे आमिष दाखवून पळवून नेले. सातारा, कोल्हापूर भागात दोघेजण एकत्र राहत होते. आरोपी योगेश वाहनांवर चालक म्हणून काम करतो.

हेही वाचा >>> दहशतवाद्यांकडून संवेदनशील ठिकाणांचे चित्रीकरण; ‘एनआयए’चा पुण्यात सखोल तपास सुरू

काही दिवसांपूर्वी योगेश आणि तरुणी कोंढव्यातील गोकुळनगर भागात वास्तव्यास आले. दोन दिवसांपूर्वी त्याने तरुणीला एकत्र आत्महत्या करु, असे सांगितले. तू खालच्या जातीतील आहे. मी पस्तावलो आहे, असे त्याने तिला सांगितले. तरुणीने आत्महत्या करण्यास नकार दिल्यानंतर त्याने मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर योगेशने पोटावर चाकूने वार केले. इमारतीच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रहिवाशांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

Story img Loader