धनंजय मुंडे यांनी स्वतः याबाबत चौकशी करा अशी मागणी केली होती
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलतोय अस सांगून पैश्यांची मागणी केल्याची घटना पिंपरी- चिंचवड शहरात घडली. घटने बाबत अज्ञात व्यक्ती च्या विरोधात चिखली पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फोन करणारा व्यक्ती बीड मधील परळी येथील असल्याचं समोर आलं आहे. तक्रारदार शिवदास साधू चिलवंत यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीचा पगार दिला नव्हता म्हणून त्या व्यक्तीच्या नातेवाईकाने मी धंनजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलतोय अस सांगून पैश्यांची मागणी केली होती. त्यामुळं तो फोन करणारा व्यक्ती हा परळीमधील असल्याचं उजेडात आलं आहे.
हेही वाचा >>> धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलतोय…केली पैशांची मागणी; धनंजय मुंडे यांनी केला खुलासा म्हणाले..
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिवदास चिलवंत हे जी. के. सिक्युरिटी मध्ये मॅनेजर आहेत. तिथं टाकरस नावाचा व्यक्ती काम करतो. शिवदास यांनी टाकरस यांचा पगार केला नाही. म्हणून, याच रागातून टाकरस च्या नातेवाईकाने थेट परळीतून फोन करून मी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलतोय, अस सांगून चिलवंत यांच्याकडे पैशांची मागणी केली. तसेच, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. या घटनेमुळं घाबरलेल्या चिलवंत यांनी चिखली पोलिसात तक्रार दिली. पोलिसांच्या तपासात तो फोन परळीतून आल्याचं निष्पन्न झालं असून तो धंनजय मुंडे यांच्या कार्यालयातून आला नसल्याचं स्पष्ट झालं आहे