लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. गुंडाकडून दोन पिस्तूल, चार काडतुसे जप्त करण्यात आली.

आणखी वाचा- “सरकारच्या कार्यपद्धतीला कंटाळून जीव देतोय…” मराठा तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तुळशीराम शहाजी उघडे (वय २५, रा. टिळेकरनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोंढव्यातील खडी मशीन चौकात एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विशाल मेमाणे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तुळशीरामला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे पिस्तूल सापडले. त्याच्याकडून पिस्तुलासह चार काडतुसे जप्त करण्यात आली. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिनेश पाटील, विशाल मेमाणे, सतिश चव्हाण, निलेश देसाई, लवेश शिंदे, जोतीबा पवार आदींनी ही कामगिरी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man carrying pistol arrested in kondhwa pistol along with cartridges seized pune print news rbk 25 mrj
Show comments