पिंपरी :  दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करणार्‍या पत्नी आणि मेहुणीच्या त्रासाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना देहूरोड येथे घडली. नारायण मधुकर निर्वळ (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. नारायण यांचे भाऊ ज्ञानेश्वर मधुकर निर्मळ (वय ३९, रा. सोमठाना, ता. मानवत, जि. परभणी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुण्यात तीन ठिकाणी आगीच्या घटना; लष्कर भागातील मॉडर्न डेअरीला फटाक्यांमुळे आग

नारायण यांची पत्नी आणि मेहुणीला पोलिसांनी अटक केली. नारायण हे अ‍ॅनिमेशन व्यवसाय करीत होते. त्यांच्याकडे दोघींनी दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली.  त्यांना पत्नी आणि मेहुणी या दोघींनी मिळून मानसिक त्रास दिला. तसेच, नारायण यांच्या पत्नीच्या चुकीच्या कृत्यांना मेहुणीने प्रोत्साहन देऊन वाद घातला. या त्रासाला कंटाळून नारायण यांनी १७ जानेवारी रोजी घरी विषारी औषध प्राशन केले. त्यांना महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान २० जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. निर्वळ यांनी आपल्याला पत्नी आणि मेहुणीकडून त्रास होत असल्याबाबत भाऊ ज्ञानेश्वर यांना संदेश केला होता. फौजदार सोहन धोत्रे तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man commits suicide after wife sister in law asking money for liquor pune print news ggy 03 zws