पिंपरी : प्रेयसी आणि योगा प्रशिक्षकाने लैंगिक अत्याचाराच्या  खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याने तरुणाने आत्महत्या केली. ही घटना चाकण येथील श्रीरामनगर येथे घडली. सूर्यकांत रामदयाल प्रजापती (वय २७, रा. चाकण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीकांत रामदयाल प्रजापती (वय २५) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक महिला आणि बापू सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला आणि सूर्यकांत यांचे प्रेम संबंध होते. महिला आणि योगा  प्रशिक्षक सोनवणे यांनी सूर्यकांतला लैंगिक अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. सूर्यकांतला समाजमाध्यमातील टेलिग्राम, व्हाट्सअप आणि गुगल पे-वर शिवीगाळ करत अपमान केला. या त्रासाला कंटाळून सूर्यकांत याने १८ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Ex PM Manmohan Singh
Dr. Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कुठे राहात होते? या बंगल्याची खासियत काय?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Dr. Manmohan Singh passes away at 92
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, आजचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार!
PM Narendra Modi and Manmohan singh
Dr. Manmohan Singh Passed away: डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
Manmohan singh and sharad pawar
Dr. Manmohan Singh Passes Away : “जागतिक धुरंधर नेता गमावला”, शरद पवारांनी डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Story img Loader