पिंपरी : प्रेयसी आणि योगा प्रशिक्षकाने लैंगिक अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याने तरुणाने आत्महत्या केली. ही घटना चाकण येथील श्रीरामनगर येथे घडली. सूर्यकांत रामदयाल प्रजापती (वय २७, रा. चाकण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीकांत रामदयाल प्रजापती (वय २५) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक महिला आणि बापू सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला आणि सूर्यकांत यांचे प्रेम संबंध होते. महिला आणि योगा प्रशिक्षक सोनवणे यांनी सूर्यकांतला लैंगिक अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. सूर्यकांतला समाजमाध्यमातील टेलिग्राम, व्हाट्सअप आणि गुगल पे-वर शिवीगाळ करत अपमान केला. या त्रासाला कंटाळून सूर्यकांत याने १८ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा