लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे: पत्नी तसेच नातेवाईकांच्या संसारातील हस्तक्षेपामुळे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पत्नीसह तिच्या नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अभय संजीवराव गवळी (वय ४१, रा. भंडलकरनगर, शेवाळवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. अभय गवळी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी पत्नी तृप्ती अभय गवळी, सासू उषा जालिंदर आंबवडे, जालिंदर आंबवडे, संतोष आंबवडे, सारिका आंबवडे (रा. कुंजीरवाडी, लोणी काळभोर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभय गवळी यांचे भाऊ सतीश (वय ४३ रा. मासुळकर काॅलनी, पिंपरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा… औंध जिल्हा रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात ठाकरे गटाचे आंदोलन

अभय यांचा नऊ वर्षांपूर्वी तृप्ती हिच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. वादातून तृप्ती आणि तिच्या माहेरकडील नातेवाईकांनी अभय यांना त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरकडील नातेवाईकांचा संसारात हस्तक्षेप वाढल्याने अभय यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.