लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राजकुमार सप्रे (वय ३२, रा. लेबर कॅम्प, मिटकॉन स्कूलमागे, बालेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

राजकुमार बालेवाडीतील मिटकॉन स्कूलमागे असलेल्या बांधकाम प्रकल्पावर कामाला होता. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ असलेल्या नऱ्हे येथील सेल्फी पॉईंटजवळ भरधाव वाहनाने दुचाकीस्वार सप्रेला धडक दिली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सप्रेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man die in two weeler accident on navale bridge pune print news rbk 25 mrj