लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: पुणे स्टेशन परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.विलास गावडे असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. गावडे यांचा पूर्ण पत्ता पोलिसांना समजू शकला नाही. याबाबत पोलीस नाईक मधुकर चव्हाण यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा- गडचिरोलीमधील भाजपचे नेते वासुदेव बट्टे यांच्या मुलीची पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या, नैराश्यातून आत्महत्या केल्याची  शक्यता

गावडे अलंकार चित्रपटगृह परिसरातून निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने गावडे यांना धडक दिली. गावडे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत आहे.