लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पैगंबर जयंतीनिमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत झेंडा फडकावणाऱ्या दोन तरुणांचा उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वडगाव शेरीतील भाजी मंडई परिसरात रविवारी सकाळी घडली.

36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mahakumbh
Mahakumbh Stampede : ‘महाकुंभमेळ्याला येऊ नका…’, चेंगराचेंगरीत मृत्यू होण्याच्या काही तासापूर्वीच कर्नाटकातील महिलेने लोकांना केलं होतं आवाहन
mahakumbh vip arrangement
Mahakumbh: चेंगराचेंगरीत सामान्य भाविकांचा मृत्यू; दुसरीकडे VIP साठी विशेष व्यवस्था, इन्फ्लूएन्सरच्या व्हिडीओवर संताप
Two children aged 2 and 17 died accidentally in separate incidents in Badlapur Kalyan East
कल्याण, बदलापूरमध्ये दोन बालकांचा अपघाती मृत्यू
senior citizen dies in st bus accident
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
pimpri female patient dies due to guillain barre syndrome
पिंपरी : गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा न्यूमोनियामुळे मृत्यू
College students die in ordnance factory explosion in bhandara
आयुध निर्माणीतील स्फोटात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, प्रशिक्षणार्थी कामगार..

अभय वाघमारे (वय १७), झकी बिलाल शेख (वय ३०) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहे. वडगाव शेरीतील भाजी मंडई परिसरात रविवारी सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी परिसरात रविवारी पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणुक आयोजित करण्यात आली होती. साडेदहाच्या सुमारास वडगाव शेरी भाजी मंडई परिसरात मिरवणुक आली. त्यावेळी काही तरुण हातात झेंडा घेऊन ध्वनीवर्धकावर थांबले होते. अभय वाघमारे आणि काही तरुण झेंडा फडकावत होते. लोखंडी गजाला झेडा लावण्यात आला होता. झेंडा फडकाविताना झेंड्याचा धक्का उच्चक्षमतेच्या वीज वाहिनीला लागला. विजेच्या धक्क्याने वाघमारे खाली कोसळला. शेख यालाही विजेचा धक्का बसला.

आणखी वाचा-सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला… म्हणाल्या, “पिंपरी- चिंचवडचा कारभारी वेगळा होता म्हणून…”

मिरवणुकीत दोन तरुणांना विजेचा धक्का बसल्याची माहिती मिळताच मिरवणुकीत गोंधळ उडाला. वाघमारे आणि शेख यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. उंचीवर उच्चदाबाची वीजवाहिनी उंचावर होते. लोखंडी गजाला झेंडा लावण्यात आला होता. गजाचा स्पर्श वाहिनीला झाल्यानंतर दुर्घटना घडली. चंदननगर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Story img Loader