स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूणीकडे पाहून अश्लील कृत्य केल्याची घटना टिळक रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार तरूणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तरूणी शास्त्री रस्त्यावरून सकाळी साडेसहाच्या सुमारास टिळक रस्त्यावरील अभ्यासिकेत जात होती. या वेळी एका अनोळखी व्यक्तीने तिचा पाठलाग केला आणि तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव तसेच कृत्य केले.
या घटनेनंतर तरूणी घाबरली होती. तिने पोलिसांकडे तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा शेंडगे तपास करत आहेत. तरूणीने दिलेल्या वर्णनानुसार आरोपीचा माग काढण्यात येत आहे. आरोपीचे वय अंदाजे ५० वर्ष असल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.