लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पत्नीचा बुद्ध्यंक कमी असल्याचा वैद्यकीय अहवाल सादर झाल्यानंतर तिच्यापासून घटस्फोट घेण्याबाबत दाखल केलेला दावा कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

अक्षय आणि रजनी (नावे बदललेली) असे दाम्पत्याचे नाव आहे. दोघांचा ६ जुलै २०२१ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांचा संसार दोन वर्षांतच संपुष्टात आला. विवाहानंतर काही दिवसांतच रजनीला घरातील कामे जमत नसल्याचे अक्षयच्या लक्षात आले. त्यावर अक्षयने पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तिला चुका दाखवून देऊन सुधारणा करण्यास सांगितले. मात्र, तिच्यामध्ये सुधारणा होत नसल्याचे दिसून आले. तिच्या वर्तनाबाबत शंका आल्याने अक्षयने तिची बुद्ध्यंक चाचणी करून घेतली. या चाचणीतून रजनी सुज्ञ नसल्याची बाब समोर आली. तिला बऱ्याच गोष्टी कळत नसल्याचे निदर्शनास आले. रजनीवर उपचार करण्याची आवश्यकता होती.

आणखी वाचा-प्रवेशासाठी २० लाखांची लाच घेताना पुणे पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता अटक

मात्र, तिच्या आई-वडिलांनी मुलीवरील उपचारास नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी पत्नीपासून घटस्फोट मिळवण्यासाठी अक्षयने वकील ॲड. रितेश भुस्कडे यांच्या मार्फत न्यायालयात दावा दाखल केला. शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे अक्षयने दाव्यात नमूद केले. या दाव्याच्या सुनावणीला पत्नी हजर झाली नाही. त्यामुळे न्यायालयाने याबाबत नुकताच एकतर्फी आदेश दिला.