पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एकावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रितेश लक्ष्मण परदेशी (वय ४८, रा. जयजवाननगर, येरवडा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. परदेशी याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी उमेश रमेश वाघमारे (वय ३८, रा. बालाजीनगर, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आराेपी वाघमारे पसार झाला आहे. परदेशी यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी आणि वाघमारे ओळखीचे आहेत. परदेशी ठेकेदार आहेत. नात्यातील एका महिलेशी परदेशी यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी वाघमारेला होता. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास दुचाकीस्वार परदेशी हे येरवड्यातील जयजवाननगर परिसरातून निघाले होते.

dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
in Pune Bundagarden police arrested two men for stabbing and robbing canteen worker
पुणे स्टेशनजवळ उपाहारगृहातील कामगाराला भोसकून लुटण्याचा प्रयत्न, बंडगार्डन पोलिसांकडून दोघांना अटक
Bangladesh husband and wife, Pimpri-Chinchwad,
पिंपरी-चिंचवडमधून बांगलादेशी पती-पत्नीला अटक; एटीबीची कारवाई, आठ दिवसांपासून हॉटेलमध्ये…
Ladki Bahin Yojana
Maharashtra News Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…
bhopal crime news
Bhopal Crime: वृद्ध आजारी आईला घरात बंद करून मुलगा फिरायला गेला, महिलेचा तहान-भुकेनं दुर्दैवी मृत्यू!
Suresh Dhas News
Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरण; सुरेश धस म्हणाले, “बीडमध्ये गँग्ज ऑफ वासेपूर सुरु आहे, आका…”
Rambhadracharya Said This About Mohan Bhagwat
Rambhadracharaya : महंत रामभद्राचार्य यांचं वक्तव्य, “मोहन भागवत हे काही हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत, आम्ही..”

हेही वाचा…पुणे स्टेशनजवळ उपाहारगृहातील कामगाराला भोसकून लुटण्याचा प्रयत्न, बंडगार्डन पोलिसांकडून दोघांना अटक

त्यावेळी आरोपी वाघमारे तेथे आला. त्याने कुऱ्हाड लपविली होती. परदेशी यांना त्याने थांबविले. नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करुन त्याने परदेशी यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. प्रसंगावधान राखून त्यांनी कुऱ्हाडीचे वार हातावर झेलले. परदेशी यांच्या दोन्ही हातांना जखम झाली. दुचाकीवरुन तेे तोल जाऊन पडले. त्यानंतर आरोपीने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या परदेशी यांना या भागातील नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. आरोपी वाघमारे तेथून पसार झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

Story img Loader