पुणे : प्रेमसंबधातील वादातून एका तरुणाने मैत्रिणीसमोर तिच्याच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी सिंहगड पायथा परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. मृत तरुण आणि त्याची प्रेयसी यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
हेही वाचा >>> पुणे : सोळा टन ई-कचऱ्याचे संकलन
रविवारी (१६ ऑक्टोबर) दोघेजण सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलमध्ये गेले होते. त्या वेळी दोघांमध्ये वाद झाले. तरुणाने प्रेयसीची ओढणी घेतली. त्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. घाबरलेल्या तरुणीने या घटनेची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना दिली. तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.