पुणे : ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरून तिला जीवे मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या एकाला फरासखाना पोलिसांनी अटक केली. गजबजलेल्या गणेश पेठेतील डुल्या मारुती चौक परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी विक्रम जोगी विश्वकर्मा (वय ३०, मूळ रा. नेपाळ) याला अटक करण्यात आली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला गणेश पेठेत एकट्याच राहतात. त्यांची मुलगी विवाहित असून, ती धनकवडीतील आंबेगाव पठार भागात राहायला आहे.

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू

हे ही वाचा…पुणे : महापालिकेने दिल्या २२९ मूर्ती विक्रेत्यांना नोटीस, काय आहे कारण ?

सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास विश्वकर्मा गणेश पेठेतील महिलेच्या घराजवळ आले. पावसामुळे दरवाजा खराब झाल्याने महिलेने दरवाजा उघडा ठेवला होता. कोणी नसल्याचे पाहून विश्वकर्मा घरात शिरला. ज्येष्ठ महिला झोपेत होत्या. विश्वकर्माने महिलेच्या तोंडावर उशी दाबली. महिलेने विरोध करून आरडाओरडा केला. रहिवाशांनी त्वरीत या घटनेची माहिती दिली. गणेश पेठ पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. विश्वकर्माला ताब्यात घेतले.

हे ही वाचा…शहरबात: समित्या आहेत, सुसंवादाचं काय?

विश्वकर्मा फिरस्ता असून, तो सध्या सदाशिव पेठेत राहायला असल्याची माहिती मिळाली. चोरीच्या उद्देशाने त्याने ज्येष्ठ महिलेला मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करत आहेत.