पिंपरी-चिंचवड : शहरामध्ये अमानवीय घटना घडली आहे. पत्नीवर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या गुप्तांगाच्या बाजूला होल पाडून कुलूप बसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीसदेखील चक्रावले आहेत. याप्रकरणी ३० वर्षीय आरोपी पतीला अटक करण्यात आली असून २८ वर्षीय पीडीतेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दिनांक ११ मे रोजी सतत संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या पत्नीला आरोपी पतीने बेदम मारहाण केली. आधी ब्लेडने गुप्तांगावर वार केले. दोन्ही हात पाय बांधून लोखंडी खिळ्याने गुप्तांगाला दोन्ही बाजूने होल पाडले. तिथं पितळी कुलूप बसवलं असल्याचं पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

आणखी वाचा-पुणे : वर्चस्वाच्या वादातून कोयत्याने वार करून तरुणाचा खून

अमानवीय आणि राक्षसी कृत्याबद्दल पीडीतेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अद्यापही पीडित विवाहित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हे दाम्पत्य नेपाळ येथील आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर, आरोपी हा वॉचमनचे काम करतो आणि महिला गृहिणी आहे. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनीदेखील हळहळ व्यक्त केली आहे.