पिंपरी- चिंचवड : शहरात अज्ञात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने निलेश अशोक भंडारी नावाच्या व्यक्तीची चाकू, कोयत्याने वार करून दगडाने ठेचून हत्या केली आहे. निलेश याचे अधिकृत ताडी विक्री करण्याचे दुकान आहे. मेहुना आणि निलेश दोघे दुचाकीवरून घरी जात असताना त्यांना अडवून हत्या केली आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. देहूरोड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा-पुणे: पाणी मागितल्याच्या कारणावरून वाद; आतेभावाचा केला खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश अशोक भांडरी हा अधिकृत ताडी विक्री करण्याचा व्यवसाय करायचा. त्याच ओटास्कीम निगडी आणि देहू येथे अधिकृत ताडी विक्रीचा व्यवसाय आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास मेहुणा आणि मयत निलेश हे दोघे दुचाकीवरून देहूगाव येथे दुचाकीवरून घरी येत होते. तेव्हा, अज्ञात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून त्यांचा दुचाकीला धक्का देऊन खाली पाडले, मग मेहुण्यासमोरच निलेशची धारदार चाकू, कोयत्याने वार करून आणि दगड, सिमेंटच्या गट्टूने ठेचून हत्या केली. आरोपी हे फरार असून त्यांचा शोध देहूरोड पोलीस घेत आहेत. ही घटना देहूगाव- तळवडे रस्त्यावर घडली आहे. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.