पिंपरी- चिंचवड मध्ये प्रेयसीची हत्या करण्याचा प्रयत्न करून प्रियकराने गळफास घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घटनास्थळी पिंपरी पोलीस दाखल झाले आहेत. दुपारी साडेचार च्या सुमारास पिंपरीतील खराळवाडीत असलेल्या हॉटेल राज प्लाझा या ठिकाणी घटना घडली आहे. नितेश नरेश मिनेकर वय- ३४ रा. येरवडा अस आत्महत्या केलेल्या तरुणाच नाव आहे. तर, २८ वर्षीय तरुणी गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चारच्या सुमारास लॉज राज प्लाझा येथे आले होते. त्यांनी त्या ठिकाणी रूम बुक केली होती. अवघ्या काही मिनिटातच दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. हे ऐकून हॉटेल व्यवस्थापकाने ११२ नंबर वर फोन करून पोलिसांना बोलून घेतलं. पोलीस हॉटेलमध्ये आले, त्यांनी त्या दोघांच्या रूमचा दरवाजा ठोठावला. आतून नितेशने कपडे घालत आहे. दरवाजा उघडतो, असं उत्तर दिलं. परंतु, त्यानंतर बराच वेळ झालं दरवाजा उघडत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा, २८ वर्षीय तरुणी रक्ताच्या थारोळ्यात तर नितेश ने गळफास घेतल्याचं उजेडात आलं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हत्या आणि आत्महत्या ही प्रेम प्रकरणातून झाल्याचा अंदाज पिंपरी पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. घटनेत तरुणी गंभीर जखमी प्रकृती चिंताजनक आहे. तरुणीवर महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

blind couple stays with son's body
Blind Couple: मुलाचा घरात दुर्दैवी मृत्यू; अंध आई-वडील उपाशीपोटी चार दिवस घरातच पडून, हृदय पिळवटून टाकणारी घटना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Local panchayat member, Sudhamoni, said the couple was known in the area for their YouTube channel.
Good Bye चा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही तासांतच सापडले व्ह्लॉगर जोडप्याचे मृतदेह, कुठे घडली घटना?
raj thackreray on chhagan bhujbal
“राजकारणातील सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच” म्हणणाऱ्या छगन भुजबळांना राज ठाकरेंचा टोला; म्हणाले, “त्यांनी आता…”
Delhi crime News
Delhi : धक्कादायक! टोपीवरून झालेल्या वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या; आरोपीच्या आईने पुरवली बंदूक
Indian Army dog Phantom
Jammu Kashmir Encounter: दहशतवाद्यांशी लढताना भारतीय लष्कराचा ‘फँटम’ श्वान शहीद; लष्काराकडून हळहळ व्यक्त
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Story img Loader