पिंपरी : पिंपरीमध्ये आर्थिक वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. कुऱ्हाडीने वार करून महेश मोटवानी यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपी राम मनवाणी हा थेट रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह पिंपरी पोलीस ठाण्यात हजर झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास महेश मोटवाणी कामावर जाण्यासाठी घराबाहेर आले. शेजारीच राहणारा राम त्यांची वाट पाहात होता. रामने महेश यांच्या डोक्यात आणि खांद्यावर कुऱ्हाडी वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महेश हे गंभीर जखमी झाले होते. तातडीने त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. परंतु, महेश यांना तपासाअंती मृत घोषित करण्यात आलं.

आणखी वाचा-पुणे : वारजे भागात दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणीचा मृत्यू

घटनेनंतर रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन रामने थेट पिंपरी पोलीस ठाणे गाठून हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीसही अवाक झाले होते. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनस्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हत्या करण्यात आलेल्या महेश आणि आरोपी राम यांच्या आर्थिक वाद होते. यावरून त्यांच्यात अनेकदा किरकोळ वादही झाले होते. अखेर आज सकाळी राम ने कुऱ्हाडीने वार करून महेश यांची हत्या केली आहे. घटनेप्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत असून आरोपी अटक आहे.