लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : काम करण्यास सांगितल्याने मुलाने वडिलांवर कात्रीने वार करुन त्यांचा खून केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. झोपेत असलेल्या वडिलांवर कात्रीने हल्ला करणाऱ्या मुलाला त्याच्या आईने रोखण्याचा प्रयत्न केला. मुलाने केलेल्या हल्ल्यात त्याची आई जखमी झाली आहे.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना

लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय ५५, रा. मास्टर कॉलनी, टिंगरेनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय २०) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत शिवनाथचा मामा बाबू दांडेकर (वय ३६, रा. टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शिवनाथ काही काम करत नव्हता. त्यामुळे वडील लक्ष्मण यांनी त्याला काम करण्यास सांगितले होते. काम कर, चांगले रहा, असे त्यांनी त्याला सांगितले होते. मध्यरात्री लक्ष्मण गाढ झोपेत होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास शिवनाथने झोपेत असलेल्या वडिलांवर घरातील कात्रीने छाती आणि पोटावर वार केले.

आणखी वाचा-पुणे : गणेशोत्सवाच्या काळात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मिळणार विनामूल्य औषधोपचार

पती लक्ष्मण यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून शिवनाथची आई झोपेतून जागी झाली. शिवनाथने आईच्या हातावर कात्रीने वार केले. शिवनाथला अटक करण्यात आली असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे तपास करत आहेत.

Story img Loader