पुणे रेल्वे स्थानकात तोतया लष्करी अधिकाऱ्याला रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. दिल्लीतील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला २० वर्षीय तोतया अधिकाऱ्याने लष्कराचा बनावट गणवेश घालून हजेरी लावली होती. नीरज विश्वकर्मा, असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीरज विश्वकर्मा ( वय, २० ) हा उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहे. शनिवारी पुणे स्थानकात लष्करी गणवेशामध्ये नीरज विश्वकर्मा संशयास्पदरित्या फिरताना आढळला. चौकशी केल्यावर नीरज विश्वकर्माला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं.

हेही वाचा :पुणे: डेक्कन जिमखाना भागात व्हेल माशाची उलटी जप्त, आंतराष्ट्रीय बाजारात पाच कोटी किंमत

त्यानंतर तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत. १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन साजरा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं होतं. तेव्हा, विश्वकर्मा लष्करी अधिकाऱ्यासारखा लाल किल्ल्यावर गेला होता. त्याने काही छायाचित्रेही काढल्याचं समोर आलं आहे. तसेच, त्याच्याकडून लष्कराचे बनावट कॅन्टीन कार्डही जप्त केलं आहे.

हेही वाचा : गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात राडा

“संशियत आरोपीने १२ वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. लष्करी अधिकारी म्हणून त्यानं देशातील विविध ठिकाणी भेटी दिल्या आहेत,” अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man posing army commando arrested from pune railway station attended independence day parade ssa