पुणे : पेट्रोल भरण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर मित्रावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. अरबाज अरिफ सय्यद (वय २८, रा. कुबेरा कॉलनी, एनआयबीएम रस्ता कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत योगेश रामदास लोंढे (वय २८, रा. सोमेश्वर सोसायटी, उंड्री) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> मंत्रालयात लिपिक असल्याच्या बतावणीने महिलेची २० लाखांची फसवणूक
कोंढव्यातील कडनगर परिसरात योगेश एका पंक्चर दुकानात रविवारी सकाळी थांबला होता. त्याच्या दुचाकीचे चाक पंक्चर झाले होते. अरबाजने त्याच्याकडे पेट्रोल भरण्यासाठी पैसे मागितले. योगेशने पैसे देण्यास नकार दिल्याने तो चिडला. शिवीगाळ करून त्याने योगेशला मारहाण केली, तसेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पसार झालेल्या अरबाजला पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील तपास करत आहेत.
हेही वाचा >>> केंद्र सरकारवर दहा वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही… केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे पुण्यात विधान
अल्पवयीनाकडून ज्येष्ठाचा खुनाचा प्रयत्न
गुळणा करताना हटकल्याने अल्पवयीनाने ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात दगड मारल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. ज्येष्ठाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी १६ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. बाशीर हैदर चौधरी (वय ६८, रा. गणेश कॉलनी, महादेवनगर, सिंहगड रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा समीर बाशीर चौधरी (वय ४०) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाशीर २१ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास गॅरेजसमोर थांबले होते. त्यावेळी मुलगा गुळण्या करत होता. बाशीर यांनी त्याला हटकले. मुलाने बाशीर यांच्या डोक्यात दगड मारला. पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर तपास करीत आहेत.