गुन्ह्यात खोटी साक्ष आणि चुकीच्या पद्धतीने तपास करण्याबाबत पार्थ पवार यांच नाव घेऊन पोलीस अधिकाऱ्याला धमकावत दबाव टाकल्याच प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी अश्रफ मर्चंट नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक नकुल न्यामने यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित देवराम कलाटे याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नकुल न्यामने हे करत आहेत. दरम्यान, त्यांना रजेवर असताना अश्रफ मर्चंट नावाच्या व्यक्तीने फोन करून “तुमच्याकडे अमित कलाटेचा विषय आहे ना? तुमच्या त्यात काय स्टॅण्ड आहे? मी पार्थ पवार यांचा मित्र आहे. मी अमित कलाटे, पार्थ पवार आणि यांचा पीए सागर जगताप खास मित्र आहोत. तुम्हाला जे सांगतोय ते ऐका, वाटल्यास समोरासमोर भेटतो. अमितचा विषय मिटवून घ्या, अन्यथा हे प्रकरणवर पर्यंत जाईल,” असे म्हणत धमकावले आहे.
दाखल गुन्ह्यात खोटी साक्ष आणि चुकीच्या पद्धतीने तपास करावा म्हणून हा दबाव टाकण्यात आला असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.