पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणार्‍या मुलीसमोर अश्लील कृत्य करणार्‍या २४ वर्षीय अनिल वसंत गायकवाड या आरोपीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंग्रजी भाषा विभागाकडून केमिस्ट्री विभागाच्या दिशेने तीन तरुणी पायी जात होत्या. त्यावेळी आरोपी अनिल गायकवाड याने मुलींकडे पाहून अश्लील कृत्य केले. त्या प्रकाराची माहिती विद्यापीठातील सुरक्षारक्षक महिला कर्मचाऱ्यांनी आम्हाला देताच घटनास्थळी पाहणी केली. त्यावर विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि त्याच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य झाले. आरोपी अनिल गायकवाड याला अटक केली असून आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच या प्रकाराबाबत आरोपीकडे चौकशी सुरू असल्याचे चतु:शृंगी पोलिसांनी सांगितले.