पुण्यात लष्कराचा गणवेश घालून फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून काही संशयास्पद कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. वानवडी येथील आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचे बनावट ओळखपत्र त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे.

आर्म फोर्स मेडिकल कॉलेज परिसरात एक तरुण लष्कराच्या गणवेशात फिरत होता. संशय आल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली. मात्र, तरुणाने समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. या तरुणाकडून काही संशयास्पद कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहे.

 

 

 

Story img Loader