पुणे : हातउसने दिलेले शंभर रुपये परत मागितल्याने एकाच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्याला सत्र न्यायधीश पी. पी. जाधव यांनी सात वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भीमराव यशवंत खांडे (वय ५५, रा. वडकी, खोकेनगर, मूळ रा. गिरवी, ता. फलटण, जि. सातारा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. खांडे याने  चंद्रकांत शंकर चव्हाण (वय ६८, रा. पांडवनगर, वडकी, हवेली) यांच्या डोक्यात दगड घालून खून केला होता. खांडे याने चव्हाण यांच्याकडून शंभर रुपये उसने घेतले होते. चव्हाण यांनी पैसे परत मागितले होते. पैसे परत न केल्याने त्यांच्यात १७ एप्रिल २०१५ रोजी वाद झाला. खांडे याने चव्हाण यांच्या डोक्यात दगड घालून खून केला होता. सासवड रस्त्यावर असलेल्या वडकी गावातील एका गोदामाजवळ ही घटना घडली होती. याबाबत रमेश चंद्रकांत चव्हाण (वय ४०, रा. पांडवनगर, वडकी) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

हेही वाचा >>>Pune Crime Files : जेव्हा पुण्यात एक माणूस पत्नीचं धडावेगळं केलेलं शीर हातात घेऊन फिरला होता, त्या प्रकरणाचं नेमकं काय झालं?

या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी बाजू मांडली. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी या गुन्ह्याचा तपास केला. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार ललिता कानवडे यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजात हवालदार वैजनाथ शेलार आणि प्रशांत कळसकर यांनी सहाय केले. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरुन खांडे याला न्यायालयाने सात वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man who killed for rs 100 gets seven years in prison pune print news rbk 25 amy