जेजुरी वार्ताहर

२२ सप्टेंबर रोजी मुंबई परिसरातून जेजुरीतल्या खंडोबा गडावर देव दर्शनासाठी आलेली आजी( वय ६० ) व तिची नात (वय, १३ ) कडेपठारच्या डोंगरावर दुपारी एक वाजता पायी जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना जुन्या गडावर जाण्याचा जवळचा रस्ता दाखवतो असे सांगून खोल दरीतील जानाई मंदिरात नेले. तो परिसर निर्मनुष्य असल्याने त्याने अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आजीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मात्र दोघींनी मोठा प्रतिकार केला. यावेळी झालेल्या झटापटीत मुलीची डोंगरात पडलेली पर्स व मोबाईल घेऊन हा नराधम पळून गेला.

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी भगवान यशवंत पडवळ (वय ५४, राहणार धामारी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ) याला हिंगणीगाव,(तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर) येथे सापळा रचून पकडले. त्याच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला . या गुन्ह्याचा तपास करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते, मात्र पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या. पकडण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर खून,बलात्कार, लुटमार असे नऊ गुन्हे शिरूर, शिक्रापूर, मंचर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आज या आरोपीला शिवाजीनगर पुणे येथील हजर केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली.हा गुन्हा घडल्यानंतर पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी विशेष लक्ष घातले होते.

पीडित अल्पवयीन मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस हवालदार कौशल वाळुंजकर यांनी आरोपीचे रेखाचित्र तयार केले होते या रेखाचित्रावरून व तांत्रिक माहितीच्या आधारे जेजुरी पोलिसांनी या आरोपीला पकडले. बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरीचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर अधिक तपास करीत आहेत. जेजुरी पोलीस ठाण्यात या आरोपी विरुद्ध भा. द.वि. कलम 376 /323 /504/ 506 व बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व स्तरातून पोलिसांचे अभिनंदन

जेजुरीचा खंडोबा हे साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे खंडोबाच्या दर्शनाला मोठ्या श्रद्धेने आलेल्या आजी व नातीला वाईट प्रसंगाला तोंड द्यावे लागले. गडाच्या परिसरात पहिल्यांदाच असा धक्कादायक प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती , पीडित मुलीच्या पालकांनी या प्रकाराबाबत मोठ्या धाडसाने जेजुरी पोलिसांकडे फिर्याद केली. यामुळे गुन्हा करणाऱ्या नराधमास शोधून पोलीस बेड्या ठोकू शकले. पोलिसांनी अवघ्या २४ तासात गुन्हेगाराला शोधून अटक केल्याने सर्व स्तरातून पोलिसांचे अभिनंदन होत आहे.

जेजुरी परिसरात दोन वर्षांपूर्वी आरोपी होता कामाला

जेजुरी जवळील जवळार्जुन या गावी आरोपी मजुरी काम करत होता,तेथे राहिलेले कामाचे पैसे नेण्यासाठी तो आला होता, यावेळी त्याने कडेपठारच्या डोंगरात जाऊन हा गैरप्रकार केला.