पुणे : ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीचे विसर्जन झाले. कसबा गणपती टिळक चौकात आल्यानंतर गणपती बाप्पा मोरयाचा जोरदार घोष झाला. कसबा गणपती मंडळाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने सकाळी साडेदहा वाजता चांदीच्या पालखीतून निघाली. बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्ता मार्गे विसर्जन मिरवणूक दुपारी ३.२५ वाजता टिळक चौकात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

उपमुख्यमंत्री,  पालकमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पदाधिका-यांचे स्वागत केले. रमणबाग ढोल-ताशा पथक, गणेशोत्सवाची माहिती देणारा विशेष रथ, परशुराम आणि रूद्रगर्जना ढोल-ताशा पथक, प्रभात बँडपथकासह आर्ट ऑफ लिव्हिंग, कामायनी संस्था, रोटरी क्लबच्या परदेशी पाहुण्याचा मिरवणुकीत सहभाग कसबा गणपतीचे वैशिष्ट्य ठरले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manacha first kasba ganpati immersion concluded peacefully pune print news apk 13 zws