वारजे भागात ज्येष्ठ महिलेकडे बतावणी करुन चोरट्यांनी तिच्याकडील मंगळसूत्र लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा- पुणे: वानवडीत दहशत माजविणाऱ्या गुंडाच्या विरोधात कारवाई
तक्रारदार महिला भाजी खरेदीसाठी निघाल्या होत्या. त्या वेळी ओंकार काॅलनी परिसरात चोरट्यांनी त्यांना अडवले. आमच्या मालकांना मुलगा झाला असून ज्येष्ठ महिलांना साड्या वाटप करण्यात येत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर ज्येष्ठ महिलेला चोरट्यांनी मंगळसूत्र काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले. चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवले. महिलेच्या नकळत चोरट्यांनी पिशवीतून मंगळसूत्र काढून घेतले. चोरटे तेथून पसार झाले. महिलेने पिशवीची पाहणी केली. तेव्हा मंगळसूत्र लांबविल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.