पुणे : राज्यातील पल्प उद्योग (कॅनिंग ) अडचणीत सापडला आहे. मागील वर्षीचा ३० टक्के पल्प (गर) पडून आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात किती पल्प तयार करायचा, बाजारात अपेक्षित दर मिळेल का, अशी संभ्रमावस्था पल्प उद्योगात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षी हापूसचे उत्पादन कमी होते. पल्प उद्योगासाठी हापूस आंबा मिळत नव्हता. त्यामुळे वाढीव दराने म्हणजे सरासरी ५० रुपये किलो दराने आंब्याची खरेदी करून पल्प तयार करण्यात आला. अखेरच्या टप्प्यात काही उद्योगांनी ५६ रुपये दरानेही आंबा खरेदी केला होता. त्यामुळे पल्पच्या उत्पादन खर्चात वाढ झाली. पण, वाढीव उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारातून वाढीव दर मिळाला नाही. त्यामुळे मागील वर्षाचा सुमारे ३० टक्के पल्प अद्यापही पडून आहे. पल्प पडून असल्यामुळे केलेली आर्थिक गुंतवणूकही अडचणीत आली आहे. परिणामी यंदाच्या पल्प उत्पादन हंगामासाठी लागणारे खेळते भांडवलही अडकून पडले आहे. त्यामुळे यंदा किती पल्प तयार करायचा, पल्पला अपेक्षित दर मिळेल का, अशी संभ्रमावस्था उद्योगात असल्याची माहिती पल्प उद्योजक अमर देसाई यांनी दिली.

हेही वाचा… पंतप्रधानांनी आपल्या गुरूविषयी वापरलेली भाषा निषेधार्ह; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

हापूस उत्पादक आणि पल्प उत्पादक अमोल भागवत म्हणाले, की पल्प उद्योगात स्पर्धा वाढली आहे. मोठ्या कंपन्या जेमतेम सहा-सात आहेत. पण, लहान प्रमाणात पल्प तयार करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उद्योगांची संख्या वाढल्यामुळे पल्प विक्रीतील स्पर्धाही वाढली आहे. या स्पर्धेत लहान उद्योगांचे मोठे नुकसान होते. ज्यांची विक्रीची व्यवस्था नाही, ते पल्प उद्योग अडचणीत आले आहेत.

आंब्याचा खरेदी दर वाढणार

सध्या पल्पसाठी ३० ते ३५ रुपये दराने आंबा खरेदी केला जात आहे. सध्या स्थानिक, लहान उद्योजकांकडून पल्पनिर्मिती सुरू आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून मोठ्या कंपन्या पल्प निर्मिती सुरू करतील. त्यामुळे मे महिन्यात आंब्याची खरेदी सरासरी ३५ रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे. कोकणात सुमारे २०० लहान-मोठे पल्प उद्योग सुरू आहेत. दरम्यान, आंबा उत्पादकांनी मागील वर्षाइतका म्हणजे सरासरी ५० रुपये किलो दराने आंबा खरेदी करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा… मावळमध्ये महायुतीत अस्वस्थता? दिल्लीहून सहा जणांचे पथक दाखल

मेपासून दरवाढ होणार

यंदा पल्प उद्योगासाठी आंब्याची उपलब्धता चांगली आहे. मे महिन्यापासून मोठ्या कंपन्या पल्पनिर्मिती सुरू करतील. त्यानंतर शेतकऱ्यांना सरासरी ३० ते ३५ रुपये किलो दर मिळू शकेल. उत्पादन खर्च, बाजारातील पल्पची मागणी आणि पल्पचा दर पाहता शेतकऱ्यांना ३२ ते ३५ रुपये दर देणे शक्य आहे, असे मत आंबा पल्प उद्योजक अमर देसाई यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mango pulp business in trouble pune print news dbj 20 asj
Show comments