पुणे : सुवासिक आंबेमोहाेर तांदळाचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीला आंबेमोहोर तांदळाच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात केंद्र शासनाने बिगर बासमती तांदळावरील निर्यात बंदी मागे घेतली, तसेच २० टक्के निर्यात कर कमी केला. परदेशातून आंबेमोहोर तांदळाला मागणी वाढल्याने हंगामाच्या सुरुवातीला आंबेमोहाेर महाग झाल्याची माहिती तांदूळ व्यापाऱ्यांनी दिली.

घाऊक बाजारात प्रतिक्विंटल आंबेमोहोर तांदळाचे आठ ते नऊ हजार रुपये दर मिळाले आहेत. गेल्या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला सात ते साडेसात हजार रुपये दर मिळाले होते. आंबेमाेहोरची सर्वाधिक लागवड मध्य प्रदेशात केली जाते. आंबेमोहोरची ८० टक्के लागवड मध्य प्रदेशात केली जाते. आंध्र प्रदेशात आंबेमोहोरची लागवड केली जाते. यंदा मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशात लागवड कमी झाली आहे. बिगर बासमती तांदळावरील निर्यात बंदी मागे घेतल्याने व्यापाऱ्यांनी जागेवरच आंबेमोहोरची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. त्यामुळे यंदा हंगामाच्या सुरुवातीला आंबेमोहाेरच्या दरात मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील जयराज आणि कंपनीचे संचालक तांदूळ व्यापारी धवल शहा यांनी दिली. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवीन आंबेमोहोर तांदळाची आवक होण्यास सुरवात होते. आंबेमोहोर तांदळाच्या दरात १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे. वर्षभर वापरल्या जाणाऱ्या बासमती, आंबेमोहोर, इंद्रायणी, सुरती कोलम या तांदळापैकीआंबेमोहोरला चांगली मागणी आहे.

Social Justice Minister Sanjay Shirsat warned of action against contractors if they failing to provide facilities
वसतिगृहांमधील असुविधेबाबत थेट ठेकेदारांवर कारवाई होणार ?
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Indrayani river is foaming in Alandi
आळंदी: हिमालयातील नदी की इंद्रायणी? वारकऱ्यांच आरोग्य धोक्यात!
Free special bus service will provided by PMP on occasion of Koregaon Bhima Vijayastambha Salutation Ceremony
पीएमपीची दोन दिवस मोफत बस सेवा… असे असणार मार्ग
dgp rashmi shukla reviews security arrangements for koregaon bhima battle anniversary event
पोलीस महासंचालकांकडून विजयस्तंभ अभिवादन सोहळा बंदोबस्ताचा आढावा; पोलीस आयुक्तालयात बैठक
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
fire incidents in Mumbai Andheri Goregaon Matunga
Mumbai Fire News: अंधेरी येथे भंगाराच्या गोदामाला भीषण आग; मुंबईत घडल्या चार आगीच्या घटना
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…

हेही वाचा >>>आळंदी: हिमालयातील नदी की इंद्रायणी? वारकऱ्यांच आरोग्य धोक्यात!

महाराष्ट्रात आंबेमोहोरच्या लागवडीत घट

आंबेमोहोर तांदळाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये होते. पुणे जिल्ह्य्ताील कामशेत, भोर या भागात काही प्रमाणात त्याचे उत्पादन घेतले जाते. काही वर्षांपूर्वी आंबेमोहोरचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात घेतले जात होते. तांदूळ लागवड करणाऱ्या पुणे, मावळ, भोर, कामशेत या भागात झपाट्याने शहरीकरण वाढले. जमिनींना चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या. आंबेमोहोरची लागवड वर्षातून एकदाच घेतली जाते. लागवडीस वेळ लागत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवडीकडे पाठ फिरवली. आंबेमोहोर तांदळाची लागवड महाराष्ट्रातून कमी होत चालली आहे.

हेही वाचा >>>पोलीस महासंचालकांकडून विजयस्तंभ अभिवादन सोहळा बंदोबस्ताचा आढावा; पोलीस आयुक्तालयात बैठक

आंबेमोहोरला उच्चांकी दर ?

सुगंधी आंबेमोहोर तांदळाचा राजा म्हणून ओळखला जातो. हा तांदूळ महाराष्ट्रात बारा महिने वापरला जातो. विशेषतः पुणे, मुंबई, ठाणे या शहरातून आंबेमोहोर तांदळाला खूप मोठी मागणी आहे. यावर्षी बासमती तांदळाच्या दरांपर्यंत आंबेमोहोर तांदळाचे दर पोहोचतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास हा एक विक्रम होईल. त्याचबरोबर आंबेमोहोर तांदळाचे दर यावर्षी कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे, असे तांदूळ व्यापारी धवल शहा यांनी नमूद केले.

Story img Loader