श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे सरचिटणीस माणिक चव्हाण आणि सरचिटणीस पदी हेमंत रासने यांची निवड करण्यात आली. गुरुवारी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पुढील दोन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पुणे : महापालिका प्रशासकपदाची जबाबदारी सौरभ राव यांच्याकडे ?

विश्वस्त मंडळाच्या बैठकीला ट्रस्टचे डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, अक्षय गोडसे, अमोल केदारी, कुमार वांबुरे, मुरलीधर लोंढे, उत्तमराव गावडे उपस्थित होते. २०२२ ते २०२४ या दोन वर्षांसाठी ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, विश्वस्त कुमार वांबुरे, मुरलीधर लोंढे, उत्तमराव गावडे कार्यरत राहणार आहेत.

Story img Loader