गेल्या आठवडय़ात भरलेल्या मिसळ महोत्सवात तशी अनेक आकर्षणं होती. त्यात विविध गावांची वैशिष्टय़ं जपणाऱ्या मिसळी होत्या आणि त्यातलं एक नाव अगदी लक्ष वेधून घेत होतं. श्रीरामपूरची मिसळ, नाशिकची मिसळ तशी मणिनगरची (अहमदाबाद- गुजरात) मिसळ ही पाटी वाचून कुतूहल जागं झालं. इतर मिसळी माहिती होत्या; पण मणिनगरची मिसळ हा काय प्रकार आहे, याची फार उत्सुकता लागली होती. मिसळ महोत्सवातील सुरुवातीची फेरी पूर्ण झाल्यावर पहिल्यांदा मणिनगरचा स्टॉल गाठला. ‘मिसळ दरबार’ असं त्या स्टॉलचं नाव होतं. ग्रीन मिसळ हा प्रकार तिथे पहिल्यांदाच बघितला. त्यामुळे त्या मिसळीबाबत आणखी काही विचार न करता थेट त्या मिसळीचा मस्त आस्वाद घेतला. एकदम भारी प्रकार वाटला तो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मग ‘मिसळ दरबार’बद्दल चौकशी सुरू केली. तर मालकच तिथे भेटले. त्यांचं नाव सचिन विंचवेकर. स्टॉलवरच त्यांच्याशी गप्पा सुरू झाल्या आणि नवी नवी माहिती मिळत गेली. त्याच गप्पांमधून मणिनगरची मिसळ हा काय प्रकार आहे तेही कळलं आणि त्या माहितीने ‘पुणेरी मिसळीचा पराक्रम’ समजला. विंचवेकर मूळचे जळगावचे. आता पुण्यात. शिक्षणात तशी त्यांची बेताची प्रगती होती. त्यामुळे सगळं कुटुंब १९९६ मध्ये पुण्यात आलं. वडिलांनी रिक्षाचा व्यवसाय सुरू केला. दहावीपर्यंतचं शिक्षण झाल्यावर सचिनने आयटीआयचा एक कोर्स पूर्ण करून काही कंपन्यांमध्ये नोकरीही केली. पुढे एक दिवस मात्र त्याने मनाशी निश्चय केला की आता यापुढे एखादा छोटा का होईना; पण स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आणि अगदी छोटय़ा स्वरूपातील व्यवसायाला सुरुवात

झाली. टिळक रस्त्यावर एक छोटा स्टॉल भाडय़ाने घेऊन सचिनने ‘साई कॅफे’ या नावानं कोल्ड कॉफीचा व्यवसाय सुरू केला. त्या अनुभवातून त्याने पुढे धनकवडीत एक जागा भाडय़ाने घेतली आणि सन २००६ मध्ये तिथे कॅफे सुरू केलं. त्यात यशही मिळू लागलं. नाव झालं. हळूहळू करत आता त्या व्यवसायाच्या पंधरा फ्रँचाईजी पुण्यात आहेत.

या अनुभवातूनच मिसळीच्या व्यवसायाची पायाभरणी झाली. ‘मिसळ दरबार’ हे नावही निश्चित झालं. केवळ एकाच चवीची मिसळ न देता खवय्यांना मिसळीतही वेगवेगळे स्वाद मिळाले पाहिजेत, याचा विचार करून विंचवेकर यांनी चवींचा अभ्यास केला आणि जवळजवळ बारा ते पंधरा प्रकारातील मिसळ देण्याची तयारी केली.

असो. मूळचा मणिनगरचा मुद्दा सांगायचाच राहिला. अहमदाबादमध्ये मणिनगर हा भाग आहे. तिथले एक व्यावसायिक मितेश सोनी हे पुण्यात सचिन यांच्या कॉफी स्टॉलवर नेहमी यायचे. त्यांना मिसळ दरबारची माहिती समजली आणि त्यांनी मिसळ दरबारची एक शाखा अहमदाबादमध्ये सुरू करण्याची तयारी दाखवली. जागा घेऊन त्यांनी तिकडे फर्निचरचं काम सुरू करून तसं सचिन यांना कळवून टाकलं. त्यामुळे पुण्याच्या आधीच मणिनगरला मिसळ दरबार सुरू झालं. ‘मिसळ दरबार’ने तयार केलेले मिसळीचे टिकाऊ पाऊच आणि विविध स्वादांचे रस्से तिकडे पाठवले जातात आणि ग्राहकांच्या मागणीनुसार ते पदार्थ फक्त गरम करून देण्याचं काम तिथे चालतं. पाव मात्र स्थानिक बेकऱ्यांमधला असतो. बाकी सर्व पदार्थ पुण्याहून पाठवले जातात. तिकडच्या खवय्यांनी या मिसळीला उत्तम प्रतिसाद दिला आहे. ही मिसळ तिकडे लोकप्रिय झाली आहे. सचिन यांच्या नियोजनानुसार पुण्यात मिसळ दरबार आधी सुरू होणार होतं आणि मग अन्यत्र.

अर्थात पुणेरी खवय्यांसाठीही एक चांगली बातमी आहेच. मिसळ दरबार लवकरच म्हणजे अगदी एक-दोन आठवडय़ात बाजीराव रस्त्यावर सुरू होतंय. नेहमीची म्हणजे लाल रश्याची मिसळ, हिरव्या रश्याची मिसळ, काळ्या रश्याची मिसळ, मालवणी मिसळ, सावजी मिसळ, जैन मिसळ, दही मिसळ, दरबार स्पे. मिसळ, मस्तानी मिसळ, चीज मिसळ अशा कितीतरी चवींच्या मिसळी तिथे असतील. शिवाय, इतरही चविष्ट आणि खवय्यांना आवडतील असे काही खाद्यप्रकार असतीलच.

त्यामुळे येत्या काही दिवसांतच ‘मिसळ दरबार’च्या वेगवेगळ्या मिसळी चाखण्याची संधी मिळणार आहे. तेव्हा व्हा तयार..