मराठा आरक्षण प्रकरण न्यायालयात गेलं तर काही होणार नाही. सरकार आणि कायदेतज्ज्ञांनी मोठी मेहनत घेतली आहे. मात्र, आम्ही सावध आहोत, असं मत मनोज जरांगे पाटील यांनी मावळमध्ये व्यक्त केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरूनदेखील त्यांनी मराठा समाजाला घाबरून न जाण्याच आवाहन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – प्राध्यापक भरती प्रक्रिया लांबणीवर;अर्जांसाठी १६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी… यंदा करदिलासा

आरक्षणाचा हा कायदा ७० वर्षांचा आहे. हे मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे. सरसकट या शब्दाला काही होणार नाही. किती जण एकत्र आले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं. मराठा आरक्षण हे खेचून आणलेलं आहे. हा विजय माझा नसून अवघ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाचा आहे. त्यांनी खूप कष्ट घेतले आहे. मराठा समाज ओबीसी आरक्षणात गेला आहे. पाच महिन्यांच्या संघर्षानंतर आम्हाला आरक्षण मिळालं. या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी ही आमची मागणी आहे. ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत. त्यांना प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळावं, असे जरांगे पाटील म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil appealed to the maratha community at maval pune after devendra fadnavis statement kjp 91 ssb