शिरूर : मराठा आरक्षण आता अंतिम टप्प्यात असून या लढाईसाठी सर्वांनी मोठ्या संख्येने मुंबईत यावे आणि मराठा समाजाने आपल्यातील एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन मराठा आरक्षण क्रांती योद्धे मनोज जरांगे यांनी मंगळवारी केले. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची आग्रही मागणी असल्याचे यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटी येथून मुंबईकडे रवाना होत असलेल्या मनोज जरांगे यांच्या पदयात्रेचे शिरूर येथील सतराकमानीचा पुलाजवळ भव्य असे स्वागत करण्यात आले. मोठ्या क्रेनद्वारे त्यांना पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर जरांगे यांनी संवाद साधला.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
Deputy Commissioner Bhagyashree Navtake refusal to investigate multi-state credit union scam
बहुराज्यीय पतसंस्था घोटाळ्याच्या चौकशीला उपायुक्त नवटके यांच्याकडून सुरुवातीला नकार
Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!

हेही वाचा >>> लोकसभेसाठी पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवारांचे सर्वेक्षण सुरू; ‘या’ तारखेपर्यंत होणार उमेदवार निश्चित

जरांगे म्हणाले की समाजाचा प्रगतीसाठी आणि लेकरांच्या भविष्यासाठी शहाणपणाची भूमिका घ्यावी लागेल. शरीर साथ देत नसताना जातीसाठी, समाजासाठी जीवाची ही पर्वा न करता आंदोलन करत आहे. मराठ्यांचा ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यांना शासनाने ओबीसीचे प्रमाणपत्र द्यावे. शेवटच्या मराठाला आरक्षण मिळेपर्यत आपण हटणार नाही. आरक्षण अंतिम टप्प्यात असून ही संधी सोडू नका. आपल्यातील एकजूट कायम ठेवा. मराठे एकत्र आले तर ही जात प्रगत होईल आणि कोणापुढे हात पसरण्याची वेळ ही येणार नाही. आरक्षणाने लेकरांचे आयुष्यभराचे कल्याण होईल. मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने मुंबईत दिसतील.

हेही वाचा >>> VIDEO : “लोकसभा निवडणूक लढणार का?”… या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकही शब्द न बोलता दिली भन्नाट प्रतिक्रिया…

इतक्या वर्षात जाणूनबुजून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू दिला नाही. मराठा एक होऊ नये म्हणून प्रयत्न झाले. आता मात्र समाज एकजूट होत आहे. आंतरवलीमधून निघाल्या पासून विविध गावांतील लोक ठिकठिकाणी स्वागत करत आहे. शासनाने या लोकांच्या वेदना जाणून घेवून भानावर यावे. शांततेत मराठा आरक्षण मागणीचे आंदोलन केल्यामुळे आरक्षणाचा विषय निर्णायक टप्प्यावर आला असून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई वरून परत येणार नसल्याचे जरांगे यांनी सांगितले.   जरांगे यांच्या समवेत असणाऱ्या आंदोलनकर्त्यांची ठिकठिकाणी भोजन आणि अल्पाहाराची व्यवस्था स्थानिक ग्रामस्थ आणि विविध संस्था संघटनांनी केली होती.