राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जनजागृती आणि शांतता रॅली काढत आहे. प्रत्येक ठिकाणी सभा घेऊन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्याबाबत भूमिका मांडत आहेत. या रॅली आणि सभांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याच दरम्यान आज पुण्यातील सारसबाग येथून डेक्कनदरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरुवात झाली. डेक्कन येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. तसेच या रॅलीमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने मराठा समाजातील बांधव सहभागी झाले आहेत.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड: राजकीय मैदानावर पार्थ पवारांची बॅटिंग आणि बॉलिंग!
हेही वाचा – लोणावळ्यात जुगार अड्ड्यावर छापा; पोलिसांकडून १४ जणांवर गुन्हा
सारसबाग येथून रॅलीला सुरुवात झाली असून बाजीराव रोड, शनिवारवाडा, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, जंगली महाराज रोड, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन असा रॅलीचा मार्ग असणार आहे. या रॅलीमुळे शहरातील वाहतूक अंतर्गत रस्त्याने वळविण्यात आली आहे. तर मनोज जरांगे पाटील यांचे या मार्गावरील प्रत्येक चौकात स्वागत केले जात आहे.
© The Indian Express (P) Ltd