पुणे : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील शिवाजीनगर न्यायालयात शुक्रवारी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना २०१३ मध्ये कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते. त्यानंतर ते न्यायालयासमोर न्यायालयात हजर झाले आहेत. शिवबा संघटनेकडून नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता काही कारणास्तव प्रयोग रद्द करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यामुळे याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.या प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना वॉरंट बजावले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी जरांगे पाटील न्यायालयात हजर झाले न्यायालयाचे आदेशाचे  पालन करणे  कर्तव्य आहे.कायद्यापुढे सर्व समान आहेत, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil present in shivajinagar court pune print news rbk 25 amy