पिंपरी चिंचवड : मनोज जरांगे पाटील हे विधानसभा लढण्यावर ठाम असल्याचं पाटील यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे. केवळ उमेदवार पाडायचे आहेत? की उभे करायचे आहेत? हे समाजाला विचारायचं राहिल आहे. अन्यथा, विधानसभेची पूर्ण ताकदीने तयारी केली असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल आहे.
२९ ऑगस्टला याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. जरांगे पाटील हे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जरांगे पाटील म्हणाले, शंभुराजे महानाट्यावरून मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढे ते म्हणाले, ७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक जिल्ह्यामध्ये रॅली काढण्यात येणार आहे.
हेही वाचा…पिंपरी : मेट्रोच्या कामासाठी ५७ झाडांवर कुऱ्हाड
पुण्यामध्ये ११ ऑगस्टला रॅली काढण्यात येणार असून या रॅलीत पुण्यातील बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अस आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. बच्चू कडू यांची मागणी आणि माझी मागणी एकच आहे. शेतकरी म्हणजे आरक्षणापासून वंचित असलेले माझे बांधव आहेत. विधानसभा निवडणुक लढण्यासाठी आमची तयारी सुरू आहे. उमेदवार पाडायचे आहेत?, की उभे करायचे आहेत? हे समाजाला विचारायचं राहिलं असून आम्ही दोन्ही तयारी करून ठेवली आहे. २९ ऑगस्टला यावर निर्णय होणार आहे. असं जरांगे पाटील म्हणाले. पुढे ते म्हणाले, २८८ जागांवर आमची चाचणी झालेली आहे. असेही त्यांनी स्पष्ट केल आहे.