Manorama Khedkar Arrested from Raigad : पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात अडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबाविषयी विविध प्रकरणे समोर आली. त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील पौड येथे एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून धमकवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली असून २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पौड येथील फौजदारी न्यायालयामध्ये आणण्यात आले. न्यायालयात सरकारी वकील आणि आरोपींचे वकील यांनी आपली बाजू मांडल्या नंतर न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.

thane police commissioner chicken bird flu
ठाणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यातील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण, एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या पशुसंवर्धन विभागाकडून नष्ट
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
High Court question Home Department and Director General of Police to take action against illegal loudspeakers at religious places mumbai news
धार्मिकस्थळांवरील २,९४० बेकायदा ध्वनिक्षेपकांवर काय कारवाई केली? उच्च न्यायालयाची गृह विभागासह पोलीस महासंचालकांना विचारणा
Dombivli illegal hoardings loksatta news
डोंबिवलीत बेकायदा फलक लावणाऱ्या आस्थापनांवर फौजदारी गुन्हे, पाच हजार फलकांवर कारवाई
Meter inspector suspended in bribery case
पिंपरी : लाच प्रकरणातील मीटर निरीक्षक निलंबित
BCCI assurance on IPL security fee reduction issue Mumbai news
पोलिसांना लवकरच थकबाकी; ‘आयपीएल’ सुरक्षा शुल्क कपात प्रकरणी ‘बीसीसीआय’चे आश्वासन
crime increased in Nagpur
लोकजागर : पोलीस करतात काय?
Satara District Sessions Judge , pre-arrest bail ,
अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात

हेही वाचा…घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी; गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली ‘ही’ घोषणा

सरकारी वकील

सकाळी सव्वा नऊ वाजता महाडमधून अटक केली आहे.पिस्तुल ताब्यात घ्यायचे आहे.गुन्ह्यात वापरलेली लँड क्रुझर गाडी ताब्यात घ्यायची आहे.आरोपी प्रभावशील व्यक्ती आहे.त्यामुळे फिर्यादी आणि अन्य व्यक्तींवर दबाव टाकण्याची शक्यता आहे.त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी,इतर आरोपींना अटक करायची आहे.आरोपींची मुळशी तालुक्यात इतरही ठिकाणी जमीन आहे.या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांना धमकावले आहे का याचा तपास करायचा आहे.त्यासाठी पोलीस कोठडी मिळावी.

हेही वाचा…शेअर दलालाचे एक कोटींच्या खंडणीसाठी अपहरण, दलालाची अमरावतीतून सुटका; तिघे गजाआड

आरोपींचे वकील

आम्ही जमीन २००६ ला खरेदी केली आहे. पिस्तुलाचे लायसन्स आहे.आत्तापर्यंत आरोपीवर एक ही गुन्हा नाही. ३०७ कलम काल अचानक ॲड करण्यात आले आहे.त्याधीचे सर्व सेक्शन बेलेबल आहेत.आम्ही तपासात सहकार्य करु असे सांगण्यात आले. कोर्टाला मोबाईलवरील मनोरमा खेडकर यांचा व्हीडीओ दाखविण्यात आला.

Story img Loader