Manorama Khedkar Not Reachable : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्यानंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकरही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओमध्ये त्या हातात पिस्तुल घेऊन गावकऱ्यांना धमकावत असल्याचं दिसत होतं. याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करण्याकरता पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मनोरमा खेडकर यांचा व्हिडिओ झाला होता व्हायरल

मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये त्या एका गावातील काही शेतकऱ्यांवर दमदाटी करत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या हातात पिस्तुल दिसत असून त्यांच्यासोबत त्यांचे काही अंगरक्षकदेखील दिसून येत आहेत. एका जमिनीच्या मालकी हक्कावरून हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ मुळशी तालुक्यातल्या धडवली गावातला असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिला हातात पिस्तुल घेऊन गावकऱ्यांना धमकावत आहे. त्यांच्या बाजूला त्यांचे अंगरक्षकही दिसत आहेत. काही शेतकरी “हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तुम्ही असं करू शकत नाहीत”, असं सांगताना ऐकू येत आहेत. पण त्याचवेळी “मला कायदा सांगू नका, मला माहिती आहे सगळं, सातबाऱ्यावर माझं नाव आहे”, असं त्या गावकऱ्यांना सांगत आहेत.

Mamata Banerjee fb
Kolkata Rape Case : कोलकात्यातील डॉक्टरांच्या आंदोलनाला यश, ममता बॅनर्जींकडून तीन प्रमुख मागण्या मान्य, तरीही आंदोलन चालूच राहणार
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
Kolkata Doctor Rape and Murder
Kolkata Rape and Murder : कोलकाता रुग्णालयातले आंदोलक डॉक्टर आणि ममता बॅनर्जी यांच्यात दोन तास बैठक, नेमकं काय घडलं?
home minister amit shah slams rahul gandhi over reservation remark in america
राहुल यांच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
Mahant Ramgiri Maharaj and CM Eknath Shinde
Mahant Ramgiri Maharaj: महंत रामगिरी महाराज कोण आहेत? कोणत्या विधानामुळे त्यांच्यावर ५१ एफआयआर दाखल झाले?
Yuvraj Singh on Father Yograj Singh Says My Father Has Mental Issues Old Video Goes Viral
Yuvraj Singh: “माझ्या वडिलांचं मानसिक आरोग्य…”, योगराज सिंगांच्या धोनी-कपिल देव यांच्यावरील वक्तव्यानंतर युवराजचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल
Vanraj Andekar Shot Dead in Pune News| Pune Crime News Vanraj Andeka Attack
Vanraj Andekar Shot Dead : वनराज आंदेकरांवर बहिणीच्या पतीकडून गोळीबार; मालमत्तेच्या वादातून आंदेकरांचा खून
A case has been registered against BJP MLA Parinay Phuke and his family Nagpur news
भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यासह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल, दिवंगत भावाच्या पत्नीची पोलिसात तक्रार

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर विविध आरोप होत असतानाच आता त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांचा मुळशी तालुक्यातील धडवली गावातला पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकवतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.https://t.co/2jrmCKvB4K pic.twitter.com/UY5G1sd9Xc— LoksattaLive (@LoksattaLive) July 12, 2024

ही घटना घडली, तेव्हा यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, आता या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये मनोरमा खेडकर (Manorama Khedkar), त्यांचे पती दिलीप खेडकर, अंबादास खेडकर व इतर चार जणांची नावं आहेत. १२ जुलै रोजी शुक्रवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला. मनोरमा खेडकर यांनी धमकावल्याची तक्रार काही स्थानिक शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला असून त्यात कलम ३२३, ५०४. ५०६ नुसार नोंद करण्यात आली आहे. यामध्ये शस्त्रास्र कायद्याची कलमंही समाविष्ट करण्यात आल्याची माहिती पौड पोलीस स्थानकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली.

हेही वाचा >> “तुमचा पिस्तूल परवाना रद्द का करू नये?”, IAS पूजा खेडकरांच्या आई Manorama Khedkar पुणे पोलिसांची नोटीस

याप्रकरणी चौकशी करण्याकरता पुणे ग्रामीण पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी असलेले एक पथक शहरातील बाणेर रोड येथील मनोरमा (Manorama Khedkar) यांच्या बंगल्यावर गेले होते, परंतु त्यांचा माग काढण्यात यश आले नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. “आम्ही रविवारी आणि आज त्यांच्या घरी भेट दिली, पण आवारात प्रवेश करू शकलो नाही. त्यांचा मोबाईलही बंद आहे. एकदा आम्ही ताब्यात घेतलं चौकशी केली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल”,असं अधिकाऱ्यांनी सांगितले.