पुणे : विसर्जन मिरवणुकीत अनेकांचे मोबाइल संच गर्दीत गहाळ झाले. मोबाइल गहाळ होेणे ; तसेच मोबाइल चोरीच्या शेकडो तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. विसर्जन मार्गावर सायंकाळनंतर मोठी गर्दी झाली होती. शहर; तसेच उपनगरातील भाविकांची देखावे पाहण्यासाठी गर्दी झाली होती. गर्दीत मोबाइल संच गहाळ होणे ; तसेच मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी बंदोबस्तावरील पोलिसांकडे करण्यात आल्या.

हेही वाचा… पु्ण्यातील विसर्जन मिरवणूक यंदा विक्रम करणार ? दुसऱ्या दिवशीही रस्त्यांवरच्या रांगा संपेनात!

हेही वाचा… VIDEO पुढच्या वर्षी लवकर या…! २३ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर ‘लालबागचा राजा’चं विसर्जन

फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात अनेकजण मोबाइल चोरीच्या तक्रारी देण्यासाठी आले होते. दरम्यान, बेलबाग चौकात एका ज्येष्ठ नागरिकाचा ७० हजारांचा महागडा मोबाइल संच लांबविण्यात आला. ज्येष्ठ नागरिक पत्नीसह दर्शनासाठी आले होते. त्या वेळी चोरट्याने त्यांच्या खिशातील ७० हजारांचा मोबाइल संच लांबविला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस कर्मचारी सतीश जाधव तपास करत आहेत.