पुणे : जनावरांच्या वाहतूक करण्यावर आता अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन घ्यावा लागणार आहे. याचबरोबर वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना घेणे बंधनकारक आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) हे पाऊल उचलले आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्याअनुषंगाने परिवहन विभागाकडून वाहतूकदारांना दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांना केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनाच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल घ्यावा लागेल. याचबरोबर नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना घेणे बंधनकारक आहे.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

हेही वाचा >>>पावसाच्या अंदाजावर पाणी; राज्यात मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला; २३ जूनपासून सक्रिय होण्याचा नवा अंदाज

प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६०, प्राण्यांच्या वाहतुकीचे नियम १९७८ आणि प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (प्राण्यांची पायी वाहतूक) नियम २००१ या कायदा व नियमांच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन वाहतूकदारांना करावे लागेल. हे पालन न केल्यास त्यांना जनावरांची वाहतूक करण्यात करता येणार नाही. या तरतुदींचे पालन न केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने म्हटले आहे.

हेही वाचा >>>पुण्यात नोकरीसाठी आलेल्या २८ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न!; पत्राद्वारे मागितला न्याय

प्राण्यांचे वाहतुकीचे प्रमाणपत्रही गरजेचे

वाहनातून जनावरांची वाहतूक करताना वाहतूकदाराने सक्षम प्राधिकरण अथवा भारतीय प्राणी कल्याण मंडळ व केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी आणि प्राणी कल्याण संस्था यांनी दिलेले प्रमाणपत्र सोबत बाळगावे. असे प्रमाणपत्र नसल्यास जनावरांच्या वाहतूक करण्यास वाहतूकदाराने नकार देणे अपेक्षित आहे, असेही आरटीओने स्पष्ट केले आहे.