जेजुरी वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर येऊन देवदर्शन घेतले.यावेळी त्यांनी खंडोबा देवाला भंडार अर्पण करून मराठा आरक्षण लवकर मिळावे यासाठी साकडे घातले.आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्हाला लवकर यश मिळू दे अशी प्रार्थना केली.

खंडोबा गडावर मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत

खंडोबा देवस्थानच्या वतीने त्यांचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी स्वागत केले.जुनी जेजुरी येथील मुख्य चौकात झालेल्या सभेत त्यांनी सकल मराठा बांधवांना संबोधित केले. मराठा समाज हा मुळात मागासलेला आहे कुणबी समाज म्हणून ज्यांच्या जुन्या नोंदी आहेत.त्यांना ओबीसी आरक्षण मिळायलाच हवे, एकट्या जेजुरी परिसरामध्ये शंभर नोंदी सापडल्या आहेत.एक जरी नोंद सापडली तर साधारणपणे ६१२ जणांना आरक्षण मिळू शकते असे त्यांनी सांगितले.कोणत्याही परिस्थितीत शासनाला आरक्षण द्यावेच लागणार आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांचं जेजुरी गडावर स्वागत करण्यात आलं.

मला कुणीही अडवू शकत नाही

मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.मात्र मला कोणी अडवू शकत नाही.मराठा आग्या मोहोळाच्या जीवावर माझा लढा सुरू आहे.त्यामुळे माझ्या नादाला कोणी लागणार नाही.मी एक इंचही मागे हटणार नाही , तुम्हीही मागे हटू नका असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन जेजुरी व परिसरातील सकल मराठा समाजाने केले होत

शेवटच्या श्वासापर्यंत मागे हटणार नाही

समाज बांधवांनो हा तुमचा भाऊ शेवटच्या श्वासापर्यंत आरक्षण मिळेपर्यंत लढणार आहे, एक इंच ही मागे हटणार नाही.माझं वजन ३५ किलो इतकं हलक्यात घेत होते मात्र आता कसंही कुठेही मोजा, ते पेलवणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी भाषणात सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha aandolk manoj jarange patil takes darshan of khandoba prayer for maratha reservation scj
Show comments