पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर आणि सांगलीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पुण्यात रविवारी (११ ऑगस्ट) जनजागृती शांतता फेरी दाखल होणार आहे. त्यानिमित्ताने स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून, विविध क्षेत्रांतील मराठा बांधव या फेरीमध्ये सहभागी होणार आहेत.

सारसबाग येथील गणपतीचे दर्शन आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन केल्यानंतर फेरीला सुरुवात होणार आहे. बाजीराव रस्ता, शनिवारवाडा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास अभिवादन करून फेरी जंगली महाराज रस्ताने पुढे जाणार आहे. डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन केल्यानंतर खंडूजी बाबा चौकात फेरीची सांगता होणार आहे.

Dharashiv, OBC, Jarange Patil, Dharashiv shutdown,
धाराशिव : ओबीसीतूनच आरक्षण द्या! जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बंदला प्रतिसाद
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Preparation of 204 artificial ponds for Ganesh immersion Municipal Corporation complete
मुंबई : गणेश विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव, महापालिकेची तयारी पूर्ण
Due to hunger strike of sugarcane growers problems of Congress leaders siddharam mhetre have increased
ऊस उत्पादकांच्या उपोषणामुळे काँग्रेस नेते म्हेत्रेंच्या अडचणीत वाढ
Ravikant Tupkar, hunger strike,
बुलढाणा : रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; ११ सप्टेंबरला मंत्रालयात बैठक
Controversy between Shiv Sena-Congress leaders over statues in Buldhana
पुतळ्यांवरून वाद! बुलढाण्यात शिवसेना-काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली…
Jai Pawar, Yugendra Pawar, Kanheri,
कन्हेरीत कुस्ती आखाड्यात युवा नेते जय पवार आणि युगेंद्र पवार समोरासमोर
Devendra Bhuyar, Asha sevika, BJP allegation ,
आमदार देवेंद्र भुयार यांची ‘लाडक्या बहिणीं’वर दादागिरी; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

हेही वाचा…राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ६७ टक्के, मराठवाडा वगळता उर्वरित भागांतील धरणे तुडुंब

फेरीमध्ये सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांना पार्गिंकगासाठी श्री शिवाजी मराठा सोसायटीचे अरणेश्वर कॅम्पसचे मैदान, मामलेदार कचेरी समोरील मैदान, टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल, शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूलचे मैदान, फर्ग्युसन महाविद्यालय, शिवाजीनगर पोलीस वसाहत परिसरातील वीर नेताजी पालकर विद्यालय, दत्तवाडी येथील क्रीडा निकेतन, नवी पेठेतील धर्मवीर संभाजी प्राथमिक विद्यालय येथे व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा अखंड मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. फेरीच्या यशस्वी आयोजनासाठी दोन हजार स्वयंसेवक, मराठा सेवक कार्यरत राहणार आहेत.